@maharashtracity

धुळे: मैत्रेय गुतवंणुक कंपनीला धुळे ग्राहक मंचाने (Consumer Forum) सुमारे ५ लाखाचा दंड ठोठावत ४५ दिवसांच्या आत ठेवीदारांना ठेवीची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.

सुनावणीसाठी कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे ग्राहक मंचाने एकतर्फी ग्राहकांच्या बाजूने निकाल दिला.

धुळे (Dhule) जिल्ह्यातील मैत्रेय प्लॉटर्स ऍण्ड स्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीत अनेकांनी गुंतवणूक केली. पण मुदत पूर्ण झाल्यावरही ठेवीची रक्कम न मिळाल्याने ९८ ठेवीदारांनी ग्राहक मंचचा दरवाजा ठोठावला.

भारती मेघनाथ बागुल आणि इतर तसेच उज्ज्वला शंकरराव देवरे व इतर अशा दोन याचिका मैत्रेय प्लॉटर्स ऍण्ड स्ट्रक्चर्सच्या (Maitreya Plotters and Structures Pvt Ltd) विरोधात ग्राहक मंचात २ जुलै २०१९ मध्ये दाखल झाल्या. त्यानंतर ग्राहक मंचाने मैत्रेय कंपनीला सुनावणीला उपस्थित राहाण्याचे कळवले. पण सुनावणीला कुणीही आले नाही. या याचिकेवरील कामकाज मंगळवारी पूर्ण झाले. ग्राहकांतर्फे ऍड. चंद्रकांत येशीराव यांनी बाजू मांडली.

ग्राहक मंचाने सुनावणी पुर्ण करीत एकतर्फी निकाल दिला. भारती बागुल आणि ४८ महिलांचे १२ लाख ४ हजार ८६ रुपये, उज्ज्वला देवरे आणि ५० महिलांचे १२ लाख ३६ हजार २५० रुपये ४५ दिवसांच्या आत दरसाल दरशेकडा १२ टक्के व्याजदरासह परत करण्यासह याचिकाकर्त्यांना शारीरिक आणि मानसिक खर्चापोटी २ लाख ९४ हजार तर तक्रारीच्या खर्चापोटी १ लाख ९६ हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष, न्यायमूर्ती संजय बोरवाल, संजय जोशी (Justice Sanjay Joshi) यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here