डॉ. लहाने यांच्या सेवामुक्तीच्या मंजुरीनंतर मार्डचा निर्णय

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयातील डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ रागिणी पारेख यांच्यामुळे निवासी डॉक्टरांना नेत्र विभागात शस्त्रक्रिया करण्यास मिळत नव्हती. ते हुकूमशाही करायचे त्या मुळे गेली २५ वर्षे या विभागात शिकत असलेल्या डॉक्टरांचे नुकसान झाले असे अनेक आरोप करून त्या ठिकाणी इतर भरती करण्यात यावी, अशी मागणी मार्डकडून करण्यात येत होती. या मागणीसह इतर दोन मागण्या मान्य झाल्याने मध्यवर्ती मार्डकडून ५ जून पासून सुरु होणारा संप मागे घेण्यात आला असल्याचे घोषित करण्यात आले. हा ऐतिहासिक विजय असून याचे श्रेय राज्यभरातील सर्व निवासी डॉक्टरांना देण्यात आले आहे, असे मार्ड ने म्हटले आहे.

मध्यवर्ती मार्डने पत्रकार परिषद घेत गेल्या १५ दिवसाच्या घटनेवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला. जे जे रुग्णालयातील नेत्र विभागातील विषय, तसेच एरियार्स, स्टाईपेंड, असोसिएट प्रध्यापकांच्या भरतीचा विषय सर्वश्रुत आहे. जे जे रुग्णालय नेत्र विभागातील विषय नवीन नसल्याचे सांगत गेली 25 वर्षे या विभागातील निवासी डॉक्टर सर्जिकल कटमुळे त्रस्त होते असे मार्ड ने म्हटले आहे. गेली कित्येक वर्ष सर्जरी शिकायला आलेले निवासी डॉक्टर सर्जरी न शिकता बाहेर निघत होते. डॉ. टी पी लहाने यांचे कार्य महाराष्ट्रभर आहे. त्यांचे नेत्र विभागातील योगदानाबद्दल दुमत नाही. मात्र यामुळे निवासी डॉक्टरांच्या होत असलेल्या नुकसानीची बाब अत्यंत गंभीर होती. या हुकूमशाहीमुळे अनेक डॉक्टर गेली २५ वर्षे त्रस्त होते असे मार्ड ने म्हटले आहे.

मार्डच्या मागण्या मान्य केल्याने मध्यवर्ती मार्ड ने राज्य सरकार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांचे आभार मानले. निवासी डॉक्टरांच्या हाकेला ते धावून आले. त्यामुळेच हुकूमशाहीचा अंत झाला. उर्वरित मुद्द्यात एरियर्स आणि सहाय्य्क प्राध्यापकांची भरतीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. त्यामुळे मध्यवर्ती मार्ड ने ५ जून पासून घोषित केलेला संप मागे घेण्यात येत असल्याचे मार्ड कडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here