संतप्त मार्ड प्रतिनिधींची मागणी 

रेकॉर्ड आणि पुरस्कारांसाठी काम करण्याचा चुकीचा पायंडा 

मुंबई: जे जे रुग्णालयातील आंदोलनकर्ते निवासी डॉक्टर आणि पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यातील भांडणाने नवीनच ट्विस्ट  घेतला. येथील निवासी डॉक्टरांनी डॉ. लहाने यांनी देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार आणि गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड मागे घेण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता असून कोणताही विभाग प्रमुख फक्त रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी दिखाऊ काम करण्याची अधिक शक्यता निर्माण होईल. यातून विद्यार्थी खऱ्या ज्ञानापासून वंचित राहतील, अशी भिती या डॉक्टरांनी व्यक्त केली.

दरम्यान, आंदोलनामुळे रुग्णांना त्रास होत असल्यास ही स्थिती निर्माण होण्यास डॉ. लहाने हेच कारणीभूत असल्याचे निवासी डॉक्टर म्हणाले. नेत्र चिकित्सा विभागातील २८ डॉक्टरांना मोतीबिंदूची सर्जरी करण्यास शिकवले नाही. डॉ. लहाने यांना रुग्णांची काहीच काळजी नसल्याचे सांगितले. त्यांनी कोणतेही चांगले काम केले नसून निव्वळ स्वतःच्या नावे रेकॉर्डसाठी काम केले आहे. सर्जरीच्या संख्या वाढवून स्वतःला सन्मानित करुन घेतले. जे पुरस्कार मिळाले आहेत ते चुकीचे आहेत. मात्र एक वर्ष झाले तरी डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे काम दिले जात नसल्याने अनुभव मिळत नाही. ज्युनियर डॉक्टरला पहिल्या दिवसापासून सर्जरी करताना किमान असिस्ट करणे आवश्यक असते. इतर रुग्णालयांत तिसऱ्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून शस्त्रक्रिया शिकविण्यात येते. मात्र येथे हिशेब वेगळा असून जर तुम्ही त्यांच्या फेवरेट लिस्ट मध्ये आहात तर शस्त्रक्रिया शिकवली जाते. तरीही मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिकलेले डॉक्टर शैक्षणिक वर्षाअखेरही विश्वासाने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करु शकतील, याची खात्री नसल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

गरिब रुग्ण वॉर्डबाहेर; श्रीमंत रुग्णावर प्रोटोकॉलशिवाय शस्त्रक्रिया :

डॉ. लहाने गरीब – श्रीमंत असा भेदभाव करतात. व्हीआयपी रुग्णावर कोणताही प्रोटॉकॉल न पाळता सर्जरी केली जाते. मात्र, गरीब रुग्ण आल्यास त्यांची वागणूक बदलते. त्यांना तासनतास वाट पहायला लावली जाते. यावेळी त्या रुग्णांची काळजी घेतली जात नाही. सकाळी ८ वाजता आलेला गरिब रुग्ण सायंकाळी ४ वाजेपर्यंत बाहेर वाट बघत राहत असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here