Twitter : @maharashtracity

मुंबई 

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ७५ वर्षे पूर्ण झाली असल्याने साजऱ्या करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी माजी प्राध्यापक, डॉक्टर तसेच विद्यार्थी यांच्याकडून सक्तीने निधी गोळा केला जात आहे. यावर आक्षेप घेत सदस्य सचिन अहिर यांनी माहितीच्या मुद्द्यावरून सभागृहाच्या ध्यानात आणून दिला. यावर बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन सभागृहत निवेदन करू, अशी ग्वाही दिली. 

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ७५ वर्षे झाल्याने आजी – माजी विद्यार्थ्यांनाकडून प्लॅटिनम जुबली इव्हेंट्स साजरा करण्यात येत आहे. यासाठी आजी – माजी विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहिती सदस्य अहिर यांनी सभागृहाला दिली. त्यात प्राध्यापकांकडून १२ हजार, निवासी डॉक्टरांकडून ८ हजार तर विद्यार्थ्यांकडून ४ हजार रुपये वसूल केले जात आहेत. हे पैसे भरले नाहीत तर त्या विद्यार्थ्यांना नाहरकत प्रमाण पत्र दिले जाणार नसल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे अहिर यांनी असे वैद्यकीय शिक्षण विभाग किंवा आदेश मंत्रालयातून दिलेत का किंवा अशी रक्कम काढून असे उत्सव साजरे करावे का ? याची माहिती देण्याची विनंती केली.

त्यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांवर सक्ती केली जात असल्याची माहिती मिळत असल्याने याची दखल घ्यावी, अशी सूचना केली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिष्ठाता यांच्याशी बोलून वस्तुस्थितीचे निवेदन करू असे सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here