Twitter: @maharashtracity

नागपूर: ज्येष्ठ पत्रकार, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अरुण बाळकृष्ण फणशीकर यांचे गुरुवार दिनांक ८ जून रोजी निधन झाले. त्यांचे वय 71 वर्षे होते. ते अविवाहित होते.

काल रात्रीपासून ते बेपत्ता होते. आज दुपारी गिरिपेठेतील घरच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. गेली काही वर्षे ते असाध्य रोगाने आजारी होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे.

अत्यंत मितभाषी, हुकमी बातमीदार म्हणून त्यांची ख्याती होती. हितवाद, इंडियन एक्स्प्रेस आणि हिंदुस्थान टाइम्स या तीन दैनिकांचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले.

नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि पत्रकार क्लब ऑफ नागपूर या तीनही संस्थांच्या वतीने प्रदीपकुमार मैत्र, शिरीष बोरकर, ब्रह्माशंकर त्रिपाठी या पदाधिकाऱ्यांसह अनेक पत्रकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here