सुदैवाने पाचही जण बचावले

@maharashtracity

धुळे: मंत्रालयातील काम आटोपून धुळ्याला परतणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांच्या मोटारीला नाशिक जिल्ह्यात चांदवड नजीक भीषण अपघात झाला. या अपघातातून दैवबलवत्तर म्हणून मोटारीतील पाचही जण बचावले.

राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, चालक किरण पाटील, महेंद्र शिरसाठ, राज कोळी, राजेंद्र चौधरी हे पाच जण मुंबईला भोसले यांच्या एम.एच.18 बी.एच.2157 क्रमांकाच्या मोटारीने गेले होते.

मंत्रालयातील आणि इतर खाजगी कामे आटोपून रात्री ते धुळ्याकडे निघाले होते. वाहतुक कोंडीमुळे त्यांना धुळ्याकडे यायला उशिर झाला. चांदवडनजीक एका वळण रस्त्यावर भोसले यांच्या मोटारीचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोटार पलटली.

यावेळी रणजित भोसले हे काच फोडून कसे बसे बाहेर पडले. रस्त्यावर धावत जात मदतीसाठी त्यांनी वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला. भोसले यांच्या मदतीसाठी अन्य प्रवासी व टोल नाक्यावरील कर्मचारी देखील मदतीसाठी धावले. त्यांनी चांदवडच्या रुग्णालयात अपघातातील किरकोळ जखमींना उपचारार्थ दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here