@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी ४७७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,२६,७९७ झाली आहे. काल ३१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,७५,६६७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण २७५९ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात शुक्रवारी ४ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५०,३७,५२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,२६,७९७ (०९.५६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत १७८ बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १७८ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण ११,५१,२११ रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,७३८ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here