@maharashtracity

मुंबई: शहर भागातील कामाठीपुरा (Kamathipura) येथे म्हाडाच्या (Mhada) इमारतीचा काही भाग रविवारी दुपारच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

प्राथमिक माहितीनुसार, कामाठीपुरा दोन टाकी, युनियन बँकेसमोर, ५ वी गल्ली,चक्कु चाळ येथे म्हाडाच्या ख्वाजा मस्जिद या तळापासून पाच मजली रहिवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा जिन्याचा काही भाग रविवारी दुपारी २.२० वाजताच्या सुमारास अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नसल्याचे समजते. घटना घडताच रहिवाशी काहीसे भयभीत झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच, म्हाडा, पालिका, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ही घटना का व कशी घडली याचा शोध घेण्यात येत असल्याचे समजते.

मालाड, मालवणी येथे ९ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास एक चारमजली इमारत वजा घर शेजारील दुमजली घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ८ मुलांसह १२ जणांचा मृत्यू झाला तर ७ जखमी झाल्याची दुर्घटना घडली होती. त्याची न्यायालयाने दखल घेऊन पालिकेला चांगलेच फटकारले होते. पुन्हा अशी घटना घडल्यास खैर नाही, असा इशाराही देण्यात आला होता.

त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही व मोठी वित्तीय हानी झाली नाही. अन्यथा पालिका प्रशासन,म्हाडा यांना या घटनेबाबत न्यायालयाला स्पष्टीकरण देण्याची व आपली कातडी बचावण्याची नामुष्की ओढवली असती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here