इन्फोडोस अभियानात डॉक्टर संजय ओक यांचे वक्तव्य

@maharashtracity

मुंबई: “कोरोनाच्या संकटाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी लोकजागर, लोकशिक्षण आणि उपाययोजना ही त्रिसूत्री महत्वाची असून लोकांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवीअरचं पालन करण्याची गरज आहे” असं वक्तव्य, महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक (Dr Sanjay Oak) यांनी केले.

खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) आणि श्री राधा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इन्फोडोस’ या जनजागृती अभियानाच्या पहिल्या सत्रात डॉ. ओक यांनी थेट जनतेशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून करण्यात आलेल्या या चर्चासत्राचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी केले. अशाच रीतीने दर रविवारी खासदार शेवाळे यांच्या फेसबुक पेजवरून सकाळी 11 वाजता सामन्य जनतेला थेट तज्ज्ञांशी संवाद साधता येणार आहे.

डॉ. संजय ओक यांनी इन्फोडोस या जनजागृती अभियानाच्या पहिल्या सत्रात, ‘कोरोनाची तिसरी लाट’ (Third Wave of Corona) या विषयावर जनतेशी संवाद साधला. याआधी या अभियानाचे औपचारिक लोकार्पण डॉ. संजय ओक, खासदार राहुल शेवाळे, श्री राधा फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. कामिनी राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, विभागप्रमुख- नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या वतीने करण्यात आले.

कोरोनाची तिसरी लाट, डेल्टा प्लस, (Delta Plus), लसीकरणाविषयी गैरसमज, लहान मुलांसाठी लसीकरण अशा विविध विषयांवरील जनतेच्या प्रश्नांना डॉ. ओक यांनी उत्तरे देत मार्गदर्शन केले. तसेच सर्वांना मास्क (mask) वापरण्याचे आणि इतर नियम सक्तीने पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here