जगातील पहिली आध्यात्मिक विज्ञान व जीवनशैली वाहिनी
Twitter: @maharashtracity
मुंबई: देशातील आध्यात्मिक विज्ञानाच्या प्राचीन ज्ञानाची शक्ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी पिरॅमिड मेडिटेशन चॅनेल (पीएमसी) ही जगातील पहिली आध्यात्मिक विज्ञान व जीवनशैली वाहिनी तिच्या सॅटेलाईट आवृत्तीमध्ये हिंदीमध्ये पाहता येणार आहे.
पीएमसी हिंदी वाहिनी जिओ टीव्ही, सिटी केबल, डेन नेटवर्क, फास्ट वे, एनएक्सटी/इन डिजिटलवर २४X७ प्रक्षेपित केली जात आहे. या वर्षीच्या सुरुवातीला हिंदीमध्ये सुरुवात करण्यात आल्यापासून आता ३ कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये ही वाहिनी पाहिली जात आहे.
आनापानसति ध्यान योगाच्या साधकांनी प्रचंड संख्येने या वाहिनीला सबस्क्राईब केले आहे. पिरॅमिड एनर्जीपासून अनेकांना लाभ मिळत आहेत. भारतातील पहिली आधुनिक आध्यात्मिक विज्ञान वाहिनी आता राष्ट्रभाषेमध्ये उपलब्ध असून, ही पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुव्हमेंटची अधिकृत हिंदी मीडिया विंग आहे.
पीएमसी हे परिवर्तनकारी प्रसिद्धीमाध्यम आहे, मानवजातीला हिंसेपासून अहिंसेकडे, धार्मिक अंधविश्वासांपासून वैज्ञानिक आणि आध्यात्मिक-वैज्ञानिक प्रयोग व तर्काकडे, दिवाळखोर भौतिकवादापासून भव्य मध्यम मार्गापर्यंत, सरतेशेवटी मांसाहारापासून शाकाहार स्वीकारण्यापर्यंत नेऊन परिवर्तन घडवून आणणे या वाहिनीचा उद्देश आहे. ‘सत्य जसे आहे तसे’ प्रस्तुत करणे या वाहिनीचे लक्ष्य आहे.