मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार
Twitter: @maharashtracity
मुंबई: उत्तर प्रदेशमध्ये गोळ्या झाडल्या गेल्या आणि तुम्ही धारातीर्थी मुंबईंत का पडताय? असा सवाल भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना विचारला आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांशी ते बोलत होते.
अतिकचा एनकांऊटर झाला, तो गुंड होता, त्याची बाजू का घेताय? उत्तर परदेशमध्ये जी काल घटना घडली, त्यांचे मारेकरी पकडले, चौकशी कमिटी बसली, मग तरीही संजय राऊत यांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कशाला पडतो? प्रश्न पडतच असेल तर मग महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे असताना सीबीआय पोलीसांच्या मागे महाराष्ट्र पोलीस लागल्याचे आम्ही पाहिले, ती काय कायदा सुव्यवस्था होती का? एका व्यवसायिकाच्या घरासमोर पोलीसच स्फोटक ठेवतात, त्यातील साक्षीदाराचा मृतदेह खाडीत सापडतो, ही तुमची कायदा सुव्यवस्था होती का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना काय सांगायचेय याची प्रतिक्रिया संजय राऊत देतात, त्यांना सदैव दुसऱ्याच्या घरात डोकावून पहाण्याची सवय आहे, असा टोला आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला. तसेच अजित पवार यांच्यावरुन विचारेल्या प्रश्नावर बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी भाजपाला कोणी मदत करत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करु, असे स्पष्ट केले.
मुंबईसाठी सात कलमी कार्यक्रम ठरला
मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी काल रात्री मुंबईच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. संघटनात्मक कामाचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर आगामी काळात मुंबईकरांची सेवा करण्याचा सात कलमी कार्यक्रम त्यांनी आम्हाला दिला. त्यानुसार आम्ही यापुढे काम करु, अशी माहिती आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.