@maharashtracity

धुळे: राज्य शासकीय कर्मचारी (Government employees) व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना (Retired employees) दि.१ जुलै २०२० रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा (arrears) दुसरा हप्ता प्रदान करावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी क्युमाईन क्लबसमोर निदर्शने (protest) केली.

या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संजय पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.

याबाबत संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.१ जुलै २०२० रोजी देय असलेल्या थकबाकीच्या दुसर्‍या हप्त्याचे प्रदान जुलै २०२१ मध्ये अदा करण्यात यावे. शासनाच्या आदेशानुसार भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचार्‍यांना थकबाकीची रक्कम अदा करतांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात, थकबाकीच्या दुसर्‍या हप्त्याच्या रकमेवर दि.१ जुलै २०२० पासून व्याज अनुज्ञेय राहिल, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचार्‍यांना थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.

जे कर्मचारी दि.१ जून २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अशा कर्मचार्‍यांना थकबाकीच्या दुसर्‍या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी. अशा प्रकारचे शासनाचे आदेश असतांना थकबाकीचा दुसरा हप्ता एक वर्षाच्या विलंबाने दिला जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ३० जूनच्या शासन निर्णयात आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here