@maharahtracity

पुणे: जंगल, वनसंपदा व वृक्ष यांच्यावर काही लोकांची वाईट नजर असते व ते वन जामीन बळकावणे, झाडे तोड अशी कृत्ये करतात. हे फक्त वैयक्तिक गुन्हेगारीचे कृत् आहेच पण हे षडयंत्र घडविणारे काही माफियाजगताचीही आहेत. अशा कामात सरकार वनविभागाच्या पाठीशी आहे.

जंगले ही सर्वांसाठी ऑक्सीजन पुरविणारी फुफ्फुसे आहेत त्यांचे रक्षण झालेच पाहिजे. वन विभाग अधिकारी यांनी अशा वाईट प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, अशी भावना विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमावेळी व्यक्त केली.

सरकार वन विभागाच्या पाठीशी आहे, वन खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर पर्यावरण खाते आदित्य ठाकरे सांभाळत आहेत. नागरिक व महिला वृक्ष संवर्धनात मोठा सहभाग घेत आहेत ही आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन ना.डॉ गो-हे यांनी केले.

केशव सीता ट्रस्ट नु.मं.वी शाळा ७९ बॅच, वृक्ष संवर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भांबुर्डा येथे “प्रोजेक्ट ट्री ऑक्सिजन बँक” या उपक्रमाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here