@maharashtracity

धुळे: दोंडाईचा येथील महादेवपुरा भागात गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी जागेवर ८३० कुटुंब अतिक्रमण करून राहत आहे. त्यांना जागेचा सातबारा उतारा मिळत नव्हता. हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आमदार जयकुमार रावल (MLA Jay kumar Rawal) यांनी या भागातील नागरिकांना दिले होते. त्यानुसार सातबारा उतारा देण्यासाठी सिटी सर्व्हे मोजणीला प्रारंभ झाला. त्यामुळे लवकरच ७८३ कुटुंबांना सातबारा उतारा मिळेल.

आमदार जयकुमार रावल म्हणाले की, अमरावती नदीच्या काठी अनेक वर्षांपासून महादेवपुरा हा भाग वसला आहे. या भागातील नागरिकांना नवीन घरकुल योजनेत घरे देऊ असे आमिष काहींनी दाखवले होते. पण या नागरिकांना आता ते राहत असलेल्या जागेचाच सातबारा उतारा देण्यात येणार आहे.

अमरावती नदीकाठी असणार्‍या महादेवपुरा भागात रिव्हर फ्रंटचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. आमदार रमेश कोळी पाटील म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार (BJP government) असताना मुंबईतील १२ कोळीवाड्यातील (Koli wada of Mumbai) नागरिकांना सातबारा उतारा देण्यात आल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here