@maharashtracity

समर्थकांकडून एकविरा देवीच्या चरणी एक हजार लाडूंचा भोग

धुळे: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड (Karjat – Jamkhed) येथील खर्ड्याच्या शिवपट्टण किल्ल्यात देशातील सर्वांत उंच (७४ मीटर) भगवा स्वराज्य ध्वज साकारण्यात येत आहे. या ध्वजाची यात्रा ही महाराष्ट्रातील तसेच देशातील ७४ भक्ती-शक्तीपिठांच्या ठिकाणी भेट देत आहे. त्यापैकीच महाराष्ट्रातील शक्तिपीठापैकी पाचवे शक्तिपीठ असलेल्या धुळ्यातील (Dhule) आई एकवीरा देवी मंदिर (Ekvira temple) येथे स्वराज्य ध्वज यात्रेचे ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.

या यात्रेचे औचित्य साधून आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या समर्थकांनी आई एकवीरा देवीला १००१ लाडूचा भोग दाखवून ध्वजाची विधीवत पूजा केली. आई एकवीरा देवीच्या चरणाशी भेट देऊन ध्वज यात्रा ही पुढच्या दिशेने मार्गस्थ झाली.

यावेळी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शहराध्यक्ष रणजीत भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव सुमित पवार, कैलास चौधरी, राजेंद्र चीतोडकर, अमित पवार, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, सरोज कदम , सत्यजीत सिसोदे, कुणाल पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here