By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: आपले अखंड आयुष्य भारतभूमीला अर्पण करणारे, प्रखर राष्ट्रवादी, क्रांतिकारक, शब्दप्रभू साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनप्रवास माहितीपटातून आणि चर्चासत्रातून उलघडण्यात आला. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने गुरुवारी व्हिसलिंग वूड्स संस्थेच्या थिएटरमध्ये मुंबई दूरदर्शन केंद्राची निर्मिती असलेला “सहस्त्रसूर्य सावरकर” हा माहितीपट दाखविण्यात आला. तसेच चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने, साजरा करण्यात आलेल्या गौरव दिनी, त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनांखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये चैतन्य चिंचलीकर, पार्थ बावस्कर आणि शुभांगी सावंत यांनी सावरकरांबद्दल विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाला सह व्यवस्थापकीय संचालक गीता देशपांडे, व्यवस्थापक (कलागारे) विजय भालेराव, उप अभियंता ( स्थापत्य ) संतोष मुरुडकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखा अधिकारी राजीव राठोड, मुख्य सुरक्षा अधिकारी सुनील घोसाळकर यांच्यासह महामंडळातील अधिकारी- कर्मचारी, सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक गीता देशपांडे यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here