@maharashtracity

धुळे: धुळे बशहरातील शाळा, महाविद्यालयातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या (vaccination of students) अंमलबजावणीला सोमवारपासून सुरुवात झाली.

लसीकरणासाठी मुलामुलींनी शाळा महाविद्यालयांमध्ये रांगा लावल्या होत्या.
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी धुळे मनपातर्फे (Dhule Municipal Corporation – DMC) धुळे शहरातील झेड.बी.पाटील महाविद्यालय, जे.आर.सीटी हायस्कूल, जयहिंद हायस्कूल, एसएसव्हीपीएस कॉलेज, चावरा इंग्लीश मेडियम स्कूल या ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आली होती.

झेड.बी.पाटील महाविद्यालयात सोमवारी लसीकरणाला सुरुवात झाली. इतर केंद्रांवर मंगळावरपासून वेगवेगळ्या दिवशी लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी शाळकरी मुलं-मुली हे आपल्या पालकांसोबत केंद्रावर आले होते. आधार कार्डच्या (Aadhar Card) सहाय्याने अ‍ॅपमध्ये (Cowin App) नोंदणी करुन लसीकरण करण्यात येत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here