@maharashtracity

धुळे: धुळे शहरापासून २५ किलोमीटर अंतरावरील न्याहाळोद जवळ असलेल्या विश्वनाथ या गावाला गेले नऊ वर्षे लाल परी अर्थात एस टी ची सुविधा नाही. त्यामुळे, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या गावात एस टी सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद खांन्देश सह औरंगाबाद व नाशिक येथील शेतकऱ्यांना दैनंदिन शेती करताना नक्की काय अडचणी येतात या वर सर्वेक्षण करत आहे. या अनुषंगाने धुळ्यापासुन २५ किलोमीटर अतंरावर न्याहळोद जवळील विश्वनाथ या दुर्गम खेडेगावात सर्वेक्षण करतांना ग्रामस्थांनी सांगितले की आमच्या गावाला एस. टी बस सेवा नाही. नऊ वर्षे झाली. पण लाल परी काही आमच्या गावात येत नाही.

खूप प्रयत्नानंतर मागील दोन वर्षांपूर्वी जेमतेम एस. टी बस सेवा चालू केली. ती तीन महिने आली. पुन्हा कोरोनाच्या लढाईत प्रयत्नपुर्वक सुरु केलेली बस सेवा पुन्हा बंद झाली आहे.

त्यामुळे ग्रामस्थांना गावाला जायला, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शहरी भागात जायला, नोकरी या संदर्भात काम करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. बस सेवा चालू करा, अशी विनंती त्यांनी मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेकडे विश्वनाथ येथील ग्रामस्थांनी केली होती.

या अनुषंगाने प्रबोधन परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रा. वैशाली पाटील, जिल्हा अध्यक्ष शारदा पाटील, तालुका अध्यक्ष अर्चना पाटील, सचिव दिपाली पाटील, कोषाध्यक्ष आशा पाटील, जिल्हा प्रवक्ता यामिनी खैरणार यांनी याबाबत धुळे आगर प्रमुख यांना विश्ववनाथ या गावी बस सेवा सुरु करावी या आशयाचे निवेदन सहाय्यक वाहतूक अधिक्षक संजय आवास्तीक व विभागीय कर्मचारी अधिकारी नंरेद्र चित्ते यांना दिले.

या वेळी परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रा. वैशाली पाटील यांनी ग्रामस्थांनचा नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी ही प्रयत्न निश्चित करु, असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here