फायबर मीटर टेस्टमधून उलगडा

Twitter: @maharashtracity

मुंबई: प्रोटीन फूड्स अँड न्युट्रिशयन्स डेव्हलपेंट असोसिएशन आणि आशिर्वाद आटा यांनी प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिकेतून भारतीयांमध्ये पचनाच्या स्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यात फायबर मीटर टेस्टची मदत घेण्यात आली.  यात ६९,००० पेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग होता. या माहितीतून दिसून आले आहे की, सहभागी झालेल्यांपैकी ६९ टक्के भारतीय आवश्यक तितक्या फायबरच्या तुलनेत कमी फायबर्स सेवन करत असल्याचे समोर आले. 

दरम्यान, आहारातील फायबर हा एक अत्यावश्यक घटक असून यामुळे नियमित पचनक्रिया चांगली राहते. तसेच तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि नियमितपणे पोट स्वच्छ राहण्यासही मदत होते असल्याचे सांगण्यात आले. तसेच डायजेस्टिव्ह कोशंट टेस्ट म्हणजे पचनक्रिया चाचणीत असलेल्या जवळपास ५.७ ग्राहकांपैकी ७० टक्के भारतीय दररोज ८ ग्लासपेक्षा कमी पाणी पित असल्याचे नमूद करण्यात आले. तर ४७ टक्के भारतीय लोक दररोज सहा किंवा त्यापेक्षा कमी तास झोपतात. तसेच ३५ टक्के लोक कोणतेही शारीरिक व्यायाम करत नाहीत. फक्त ४० टक्के लोक दररोज काही ना काही व्यायाम करतात. याशिवाय ७५ टक्के भारतीयांना मध्यम ते गंभीर स्वरूपाचा ताण असल्याचे दिसून आले आहे. 

यावर बोलताना न्यूट्रीशन सायन्सेस विभाग प्रमुख डॉ. भावना शर्मा यांनी सांगितले की, व्यक्तीच्या एकूणच आरोग्यात पचनसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. डीक्यू टेस्टमधून आलेली माहिती आपल्या पोटापासून सुरूवात करून आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी महत्त्वाची ठरते. या निष्कर्षांच्या माध्यमातून देशातील नागरिकांमध्ये एक सुदृढ पचनसंस्थेसाठी व्यापक जागरूकता निर्माण करून त्यांना सक्षम करण्याचे आहे. एक संतुलित आणि पोषणसमृद्ध आहाराचे सेवन करणे, फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे आणि विचारपूर्वक खाण्याच्या सवयी लावून आपण उत्तम पचनशक्ती मिळवू शकतो आणि पचनाशी संबंधित आजार दूर ठेवू शकतो. आपण आपल्या शरीराचे पोषण करण्यासाठी आपल्या आहाराच्या निवडींचे पुनर्मूल्यमापन करून जागरूक निर्णय घेतले पाहिजे असा संदेश देण्यात येत आहे.

गव्हावर आधारित उत्पादने, मल्टीग्रेन, तृणधान्य, फळे, पालेभाज्या इत्यादींसारख्या फायबरनेयुक्त पदार्थांनी पचनाला मदत होते आणि एकूणच पचनात्मक आरोग्यात योगदान देणारे विविध प्रकारचे पोषक तत्व, जीवनसत्वे आणि खनिजे आपल्याला त्यातून मिळतात. आश्चर्याची बाब म्हणजे डायजेस्टिव्ह कोशंट टेस्टला मिळालेल्या प्रतिसादांनुसार फक्त २६ टक्के लोक रोज मल्टीग्रेनचे सेवन करतात तर १९ टक्के त्याचे अजिबात सेवन करत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here