युवक काँग्रेसच्या वतीने न्याय योजनेच्या प्रतीकात्मक शुभारंभ

संगमनेर (अहमदनगर): कोरोना (corona) संकट आणि लॉकडाऊनमुळे (lockdown) अनेक गोरगरीब मजुरांचे (labours) रोजगार (employment) गेले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने पॅकेजची (stimulus package) घोषणा केली. परंतु तिचा लाभ गरिबांना किती व कधी मिळणार प्रश्न आहे. म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या संकल्पनेतील “न्याय” (NYAY Yojana) या योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबियांना केंद्र सरकारने पुढील सहा महिने दरमहा सहा हजार रुपये अशी रक्कम थेट त्यांच्या खात्यात (DBT) जमा करावी, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँगेसचे (Maharashtra Youth Congress) प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी केली आहे.

माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या २९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त संगमनेर शिवाजीनगर येथे युवक काँग्रेसच्यावतीने “न्याय” या योजनेअंतर्गत २९००० गरीब कुटुंबांना प्रतिदिन २०० रुपये असे रोख पैसे देण्यात आले.

यावेळी सत्यजित तांबे म्हणाले की काँग्रेस नेते खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभा (Lok Sabha) निवडणूक (polls) दरम्यान गोरगरिबांसाठी “न्याय” योजनेनुसार वार्षिक १ लाख ४४ हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व कुटुंबांना दरमहा ६००० रुपये म्हणजे प्रतिदिन २०० रुपये बँक खात्यात जमा करण्याची योजना आणली होती. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कामे बंद आहेत. अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची वेळ आली आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर काम करणाऱ्या गोरगरीब, मजूर, रोजंदारी कामगार, बारा बलुतेदार , छोटे शेतकरी (farmers) अशा लोकांची खूप वाईट अवस्था झाली आहे.

केंद्र सरकारने पॅकेजच्या घोषणा केल्या. पण त्याचा लाभ गरिबांना किती व कधी लागू होईल, हा प्रश्न आहे. म्हणून देशातील व राज्यातील गरिबांना अशा संकटात तातडीने मदत मिळावी. भलेही केंद्र शासनाने या “न्याय” योजनेचे नाव बदलले तरी चालेल, असे तांबे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here