Twitter: @maharashtracity

मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाच्या रविवारी होणाऱ्या महामेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही अनुपस्थित राहणार आहेत.

रामदास आठवले (RPI leader Ramdas Athawale) यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळी पाच वाजता चुनाभट्टी येथील मैदानावर रिपब्लिकन पक्षाचा महामेळावा (RPI rally) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासह डझनभर मंत्री आणि नेते उपस्थित राहतील, असे या निवेदनात करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर (CM on Ayodhya tour) असून ते सोमवारी सकाळी मुंबईत परतणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आयोजित केलेल्या एका बैठकीला हजर रहावे लागणार असल्याने ते देखील आठवले यांच्या मेळाव्याला उपस्थित राहू शकणार नाहीत, असे समजते.

नुकताच झालेल्या नागालँड विधानसभा  निवडणुकीत (Nagaland Assembly election)  रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आल्याने पक्षांमध्ये चैतन्य आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या शक्तिप्रदर्शनात मुख्य मार्गदर्शक रामदास आठवले हे मुंबई महापालिका निवडणुकी (BMC poll) संदर्भातील भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस युती सरकारकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची मागणी रामदास आठवले यांच्याकडून या महामेळाव्यात केली जाण्याची शक्यता आहे. त्यात भाजपकडून (BJP) कितपत प्रतिसाद मिळेल हे येणाऱ्या काही दिवसात समजेल. शिवसेना – भाजप युतीकडून मनसेलादेखील (MNS) काही जागा सोडल्या जाण्याची शक्यता असल्याने निकालाचा थेट परिणाम भाजपवरच होणार आहे. त्यामुळे मित्र पक्षांना किती जागा वाटप कराव्यात याबाबत भाजपमध्ये संभ्रम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here