By Sadanand Khopkar
Twitter: @maharashtracity
नागपूर: आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हेच आहेत. कुणी औरंग्याचे नाव घेणार असेल तर त्याला माफी नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केले.
छत्रपती संभाजीनगरमधील एका युवकाने औरंगजेबाचा फोटो दाखवत नृत्य केल्याच्या बातमीसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते बोलत होते. औरंगजेबाचे फोटो कुणी झळकवणार असेल तर ते मान्य केले जाणार नाही, असेही ते म्हणाले.
कालच्या दिल्ली दौर्यासंदर्भात विरोधकांनी केलेल्या टीकेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे आरोप करतात, त्यांची अशी अवस्था आहे की, प्रात:विधीसाठी सुद्धा त्यांना हायकमांडची दिल्लीतून परवानगी घ्यावी लागते. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्ही दिल्लीला गेलो तर काय वाईट आहे? राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे आणि तो केव्हा होईल, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. जिल्हा आणि तालुका स्तरापर्यंत दोन्ही पक्षांत समन्वय घडवायचा, यासंदर्भात व्यापक चर्चा काल करण्यात आली.