Twitter : @milindmane70

मुंबई

मुंबईच्या कोविड घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते, माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात येत असल्याने ठाकरे गट अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिकेने कोरोना काळात कोट्यावधीचा घोटाळा (covid scam) केला, असा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे त्यांनी ईडीकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते. यामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar involved in Covid scam) यांचा सहभाग असल्याचे ईडीने म्हटले होते.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offence Wing) कलम 420 आणि कलम 120 ब या दोन कलमाच्या अंतर्गत किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

किरीट सोमय्या यांच्या आरोपानुसार उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी व मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कोविड कफनमध्ये ही कमाई केली. 1500 रुपयांची बॉडीबॅग (मृतदेह बॅग) 6700 रुपयांना विकत घेतली. यामध्ये वेदांत इन्नोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Vedant Innotech Pvt Ltd), महापालिकेचे अधिकारी आणि किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

मुंबईत मृतक कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग (Corona Body Bag) 2,000 ऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचे ईडीने म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने म्हटले आहे. किशोरी पेडणेकर या कोविडच्या काळात मुंबईच्या महापौर होत्या. तर दुसरीकडे ठाकरे नेते रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar under scanner of EOW) यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. रवींद्र वायकर यांची पाच तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांची कोंडी झाल्याची चर्चा आहे.

रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात सोमय्या यांनी तक्रार दिली होती. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले आहे, त्याची परवानगी वायकर यांनी महापालिकेकडून घेतली नव्हती. सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी तक्रारीत केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here