By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो घेऊन नृत्य केले गेले. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, अशी फार मोठी घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. मात्र, हे सरकार हिंदुत्त्ववादाच्या नावाने फक्त वलग्ना करीत असून हे सरकार हिंदुत्वाच्या बाजूने नाही तर हिंदुत्व विरोधी आहे, अशी टीका विधान परिषदेतील  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे केली.

अहमदनगरच्या फकीरवाडा भागात संदल उरुसच्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकवत काही तरुणांनी नाच केला आणि घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरुन भिंगार कँप पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी सरकारवर प्रखर टीका केली.

दोन महिन्यांपूर्वी अशाप्रकारे छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचवले होते. मात्र अद्याप गृह खात्याने यावर कोणतीही कारवाई केली नाही.आम्ही कडक कारवाई करू, अशा फक्त घोषणा सरकारकडून केल्या जातात. नगरमध्ये एका तरुणीचे अपहरण केले जाते, तिच्या आई वडिलांना उपोषणाला बसावे लागते ही दुर्दैवी गोष्ट आहे, अशी खंतही दानवे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here