पारदर्शक आणि निरपेक्ष बदल्यांसाठीचा प्रयत्न असल्याचा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती
Twitter: @Maharashtracity
मुंबई: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्यांच्या इतिहासात प्रथमच ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या. बदल्यांमध्ये पारदर्शकता तसेच निरपेक्षता आणण्यासाठी ऑनलाईन बदल्यांबाबत सॉफ्टवेअर तयार करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात प्रथमच फेसलेस पारदर्शक पद्धतीने सॉफ्टवेअर मधून बदल्यांची प्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. तसेच ऍपमध्ये बदली बाबत तक्रारी असल्यास सात दिवसात कळविण्यास वेळ देण्यात आला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान गट अ व गट ब च्या बदल्याही ऑनलाईन करण्यात आल्या. तर गट क संवर्गातील एकूण २४७१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबाईलवर सहजपणे बदली आदेश उपलब्ध झालेले आहेत. २२८१ (९२ टक्के) बदल्या कर्मचाऱ्यांच्या पसंतक्रमानुसार पदस्थान देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
या बदली ऍप सॉफ्टवेअरमध्ये कर्मचाऱ्यांची माहिती भरणे बाबत अधिनस्त नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाने तसेच अधिनस्त संस्थांना सुचना देण्यात आल्या. तसेच आयुक्तालयाच्या अधिनस्त गट अ, गट ब, व गट क मध्ये सर्व संवगातील कर्मचाऱ्यांचे बदल्या व बदली ऍप च्या माध्यमातून करण्यात आल्या.
या बदली ऍप मध्ये संबंधित आरोग्य संस्थामधून कर्मचाऱ्यांचे कार्यरत ठिकाणे व रिक्त पदांची माहिती भरण्यात अलेली होती. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुविधेनुसार बदली मिळावे म्हणून सॉफ्टवेअरमध्ये बदली पात्र कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता सूचीबाबत तसेच त्यांच्या अर्जाविषयी आक्षेप नोंदविण्याची सोय करण्यात आलेली होती.
तसेच संबंधित संस्था व नियंत्रण अधिकारी यांनी आक्षेपाचे निराकारण करुन तसेच कळविण्यास ऍप मध्ये सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. शिवाय कर्मचाऱ्यांना त्यांचा अर्ज तपासण्याची सुविधा तसेच कर्मचाऱ्यांची बदलीशी संबंधित माहिती म्हणजे १० पसंतक्रम विकल्प भरण्याची सोय व त्यांचे अर्जाविषयी मोबाईल फोनवर संदेश प्राप्त होण्याची सुविधा देखील देण्यात आली होती.