Twitter: @maharashtracity
हैदराबाद: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांनी आज भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Telangana CM K Chandrashekar Rao) यांची हैदराबाद येथे भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.
तेलंगणा मधील शेतकरी हा सर्व गुण संपन्न आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील तेलंगणासारखे सुखी व समाधानाचे जीवन जगता आले तर खूप बरे होईल, अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली. यावेळी आमदार बालका सुमन तसेच भारत राष्ट्र समितीच्या किसान सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव कदम यांची उपस्थिती होती.