@maharashtracity

जळकोट पंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा

मुंबई: गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाचा (BJP) बालेकिल्ला समजली जाणाऱ्या जळकोट नगर पंचायतीवर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) विजयाचा झेंडा फडकावला आहे.

या विजयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) युवा नेतृत्व आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

लातूर (Latur) जिल्ह्यातील जळकोट हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला (Bastion of BJP) समजला जात होता. पण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जळकोट येथील नगरपंचायत (Jalkot Nagar Panchayat) निवडणुकीत लक्ष घातले. त्यामुळे याठिकाणी एकूण १७ उमेदवारांपैकी महाविकास आघाडीचे (MVA) १३ उमेदवार विजयी झाले आहेत. यात ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

तर भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या या जळकोट नगर पंचायत निवडणूकीत भाजपला केवळ एका जागेवर विजय संपादन करता आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here