@maharashtracity

धुळे: धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (DCC bank election) शहादा, तळोदा व अक्कलकुवा या विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलच्या दोन व शिवसेनेची (Shiv Sena) एक जागा येणार हे स्पष्ट झाले आहे मात्र त्याची अधिकृत घोषणा माघारीनंतर म्हणजे ८ नोव्हेंबरलाच होईल.

बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे (Rajwardhan Kadambande) यांनी बिनविरोध झालेल्या नेत्यांचे अभिनंदन केले.

धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या १७ जागांसाठी आतापर्यंत ११२ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. माजी शिक्षणमंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेल ही निवडणूक लढत आहे.

याच सर्वपक्षीय शेतकरी पॅनलचे उमेदवार तळोदा विकासो मतदारसंघातून भरत बबनराव माळी, शहादा मतदारसंघातून दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्यासह शिवसेनेकडून अक्कलकुवा मतदारसंघातून आमशा पाडवी हे बिनविरोध येतील हे स्पष्ट झाले आहे.

Also Read: जिल्हा बँक निवडणुकीसाठी आघाडीचे नेते आग्रही!

दरम्यान, बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ६२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. छाननी आज गुरुवार, २१ रोजी होणार आहे. मतदान २१ नोव्हेंबरला होणार असून, मतमोजणी २२ नोव्हेंबरला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here