@mharashtracity

जनसंवाद आणि बाबूलाल जैन यांच्या संयुक्त विद्यमातुन कार्यक्रमाचे अयोजन

महाड (रायगड): महाड तालुक्यातील सापे, दहिवाड आणि वाकी आदिवासी वाडीवर आदिवासी कुटुंबाना ब्लॅंकेट वाटप (blanket distribution to tribal) करण्यात आले. महाड (Mahad) मधील व्यापारी बाबूलाल जैन आणि जनसंवाद रूरल डेव्हलपमेंट अँड सोशल असोसिएशन (JanSamvad Rural Development & Social Association) या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला.

महाड मधील सुप्रसिद्ध व्यापारी बाबूलाल जैन (Babulal Jain) आणि असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रातीच्या दिवशी आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार निलेश पवार, बाबूलाल जैन, गोपाल कांबळे, अनंत कांबळे, मिलिंद माने, आदी उपस्थित होते.

महाडमधील दुर्गम अशा सापे आदिवासीवाडी, दहिवड आदिवासीवाडी, वाकी आदिवासीवाडी, या ठिकाणी अतिशय खडतर जीवन जगत असलेल्या आदिवासी बांधवांना थंडीच्या काळात ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

आपण कमावत असेलेल्या उत्पन्नातील काही भाग हा समाजाच्या विकासाकरता देणेकरी असतो असे सांगून बाबूलाल जैन म्हणाले की आदिवासी मुलांनी निर्व्यसनी राहत आपल्या समाजाचा विकास केला पाहिजे

आदिवासी घटकाने आपल्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याकडे प्राधान्य दिले पाहिजे, शिक्षण घेतल्यामुळे समाजाचा विकास करता येईल आणि आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल असे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष पत्रकार निलेश पवार यांनी केले.

निवृत्त मुख्याध्यापक अनंत कांबळे यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे सांगून आदिवासी समाजाने आपल्या जुन्या रूढी परंपरा बाजूला ठेवून काळाप्रमाणे बदलले पाहिजे, याकरता या करता मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून जमणार नाही असे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here