@maharashtracity

चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डिव्हीआरही काढून नेला

धुळे: धुळे (Dhule) शहरातील चितोड रोडवरील क्रांती चौकातील कुरीयर कार्यालय फोडून चोरट्यांनी तिजोरीतील दोन लाखांच्या रोकड चोरुन नेली. यावेळी चोरीच्या घटनेतील पुरावे हाती लागू नये, याकरीता चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डिव्हीआर (CCTV DVR) सोबत नेला. या घटनेची माहिती कळताच श्‍वानासह (dog squad) पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

शहरातील क्रांती चौकात नागराज कॉम्पलेक्समधील इ-कॉम एक्सप्रेस कुरीयरचे कार्यालय आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी (burglary) हे कार्यालय फोडले. लोखंडी सळईच्या मदतीने शटर उचकावून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

पोलिसांच्या हाती पुरावे लागु नये यासाठी प्रथम सीसीटीव्हीचा डिव्हीआर ताब्यात घेतला. त्यानंतर कार्यालयातील तिजोरी कटरने कापली. तिजोरीत दीड ते दोन लाखांची रोकड असल्याचे सांगितले जात आहे. रोकड काढून घेत चोरट्यांनी ही तिजोरी जवळच असलेल्या काटेरी झुडपामध्ये फेकून दिली.

सोमवारी सकाळी कुरीयर कार्यालयाचे व्यवस्थापक आकाश दत्तात्रय अहिरे रा. साक्रीरोड यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती त्यांनी पोलिसांनी (Dhule Police) कळविली.

यानंतर उपअधीक्षक दिनकर पिंगळे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, मुक्तार मन्सुरी, मनिष सोनगीरे, भिकाजी पाटील, संदीप पाटील, नीलेश पोतदार, गुणवंत पाटील आदी घटनास्थळी दाखल दाखल होत टनास्थळाची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here