@maharashtracity

राज्यात २,७४० तर मुंबईत ३४५ नवीन रुग्ण

मुंबई: राज्यात सोमवारी २,७४० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत दिवसभरात ३४५ रूग्ण आढळले. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना आकडेवारी पाहिल्यास रूग्ण संख्या उतरंडीला लागल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र मृत्यू दर अद्याप २.१२ टक्के एवढ्यावर कायम आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ६५,००,६१७ झाली आहे. काल ३,२३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०९,०२१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४९,८८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात सोमवारी २७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६०,८८,११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,००,६१७ (११.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९९,१९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ३४५

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३५४०० एवढी झाली आहे. तर ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १६०२८ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here