@maharashtracity

मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचा आरोप

मुंबई: लसीची ने-आण करताना मालाड येथे जयश्री कांबळे या आरोग्य सेविकेला गंभीर अपघात घडल्याची घटना घडली. बुधवारी या आरोग्यसेविकेच्या चौकशी साठी इतर सहकारी आरोग्य सेविका आणि मुंबई मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी विदुला पाटील आल्या होत्या. यावेळी पालिका प्रशासनाचे जखमी आरोग्य सेविकेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. (injured health worker completely ignored by BMC administration)

दरम्यान मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या विदुला पाटील या केईएममधील कांबळे यांच्या आरोग्याची माहिती घेतली. त्यावेळी पाटील म्हणाल्या कि, हा अपघात ऑन ड्युटी झाला असून त्यांना कोणतीही मदत केली जात नाही. कांबळे यांचा एकमेव मुलगा आईच्या सेवेसाठी धावपळ करत असून त्यांना हवी ती मदत मिळत नसल्याची युनियनला खंत असल्याचे पाटील म्हणाल्या.

मात्र कांबळे यांच्या सहकारी आरोग्य सेविका मोठ्या संख्येने रुग्णालयात भेटायला आल्या असे विदुला यांनी सांगितले. कांबळे यांच्या जबड्याला टाके असून शस्त्रक्रिया करायची कि नाही याची चाचपणी होत आहे. सध्या त्या लिक्विडवर आहेत.

Also Read: आरोग्य सेविकेला गंभीर अपघात

महापालिकेकडून कोणी देखील अद्याप दखल घेतली नसल्याची तक्रार पाटील यांनी केली. लस आणायला गेलेल्या या आरोग्य सेविकेच्या रिक्षाला एका मोटरसायकलने ठोकल्याने रिक्षात बसलेल्या आरोग्य सेविका रस्त्यावर कोसळल्या. यात यांच्या जबड्याला गंभीर मार बसला असून सध्या त्या केईएम रुग्णालयात दाखल आहेत.

कांबळे यांच्या जबड्याला मार लागला असून हवी तसे उपचार होत नाहीत. त्यांच्या जबड्याला आणि उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. अद्याप प्लास्टर नाही. अशी गंभीर घटना झाली असताना कांबळे काम करत असलेल्या हेल्थ पोस्ट मधील एकहि कर्मचारी त्यांच्या चौकशीसाठी उपस्थित नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.

तर लसीची ने-आण करताना सोबत बीएमसी स्टाफ असल्या शिवाय आरोग्य सेविका कुठेही बाहेर जाणार नसल्याचे सांगत जखमी आरोग्य सेविकेला रुग्णसेवेचा खर्च तसेच पाच लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी पुन्हा एकदा मुंबई मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here