महाड (रायगड): मुंबई- गोवा महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून मृत्यूची संख्याही वाढली आहे. आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास मंगेश विठ्ठल भिसे (वय 37) राहणार मोहोत, भिसेवाडी याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

मंगेश व शरद पोटे राहणार वाळण हे दोघे मुंबईहून महाडकडे येत असताना माणगाव ते लोणेरे या दरम्यान त्यांचा गाडीवरुन पडून अपघात (bike accident) झाला. अपघातानंतर या दोघांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये (Mahad Rural Hospital) उपचारासाठी आणले असता यामध्ये मंगेश भिसे यांचा मृत्यू झाला.

शरद पोटे याला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अधिक तपास गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस (Police) अधिकारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here