मुंबई
या आठवड्याच्या रविवारी घरात बसून ओटीटीवर एखादी चांगली वेब सीरिज किंवा चित्रपट बघण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
ओटीटीवर काही वेब सीरिज आणि चित्रपट खूप जास्त ट्रेंड करीत आहेत. जर हा विकली ऑफ तुम्ही बाहेर न जाता घरातच घालवण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय आहेत.
1
द आर्चीज – नेटफ्लिक्स
शाहरूख खानची मुलगी, अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्रीदेवीची मुलगी या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. ही कहाणी ६० च्या दशकातील महाविद्यालयीन मुलांची आहे.
2
द रेल्वे मॅन – नेटफ्लिक्स
तुम्हाला सत्यघटनेवर आधारित चित्रपट पाहण्याची इच्छा असेल तर द रेल्वे मॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे. ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली आहे. ही वेब सीरिज भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित आहे.
3
सुखी – नेटफ्लिक्स
हलका-फुलका विनोद पाहण्याचा विचार असेल तर शिल्पा शेट्टीचा चित्रपट सुखी बेस्ट ठरेल. या चित्रपटात एक तरुणीचा जीवनपट उलगडण्यात आला आहे.
4
कडक सिंह – झी5
जर तुम्ही पंकज त्रिपाठीचे चाहते असेल तर त्याचा नवा चित्रपट कडक सिंह प्रदर्शित झाला आहे. यात इतर चित्रपटांप्रमाणेच यातही पंकज त्रिपाठीचा पॉवरपॅक अभिनय पाहायला मिळणार आहे.
5
धक धक – नेटफ्लिक्स
काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये रिलीज झालेला धक धक चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. यात चार महिलांची कहाणी दाखवण्यात आली आहे. त्या चौघीजणी बाइकवर लडाख फिरायला जातात, आणि सुरू होता त्यांचा अनोखा प्रवास…