@maharashtracity

धुळे: शहरात काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे जुलै महिन्यात डेंग्यूचे १६ रुग्ण आढळले आहेत.

नागरीकांसह नगरसेवकांनी देखील तक्रारी सुरु केल्याने महापालिकेतर्फे शहरातील विविध भागात फवारणी, धुरळणी सुरू करण्यात आली आहे.

काही दिवसांपासून डेंग्यू आणि मलेरियासदृश रुग्णांची संख्या धुळ्यात वाढली आहे. अनेकांना थंडी, ताप, खोकला, डोकेदुखीसारखी लक्षणे जाणवत आहे. त्यात बालकांचा समावेश जास्त आहे. शहरातील सर्वच भागात रुग्ण आढळून येत आहे.

शहरात जुलै महिन्यात डेंग्यूच्या ११० संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातून १६ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने साथ पसरण्यापूर्वी नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

धुळे महापालिकेने डास निर्मूलनाच्या कामासाठी ठेकेदार नेमला आहे. ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांनी गेल्या महिन्यात ६ हजार ४६६ घरांना भेट दिली. त्यातील १ हजार ७२ घरे दूषित आढळली. तसेच तपासणीत ८२३ भांड्यांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या. नागरिकांना पावसाळ्यात किमान एक दिवस तरी कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here