@maharashtracity

मुंबई: राज्यात मंगळवारी ४६० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७८,६९,४९८ झाली आहे. काल ७१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१८,५४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे (recovery rate) प्रमाण ९८.०८% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,२०९ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

तसेच राज्यात मंगळवारी ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८३,६७,६३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६९,४९८ (१०.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,५५७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत तर ६०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ६० बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ६० एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,५६,०९५ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६,६९२ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here