र्ल्ड काँग्रेस ऑफ ऍनिमिया आणि मुंबई प्रसूती आणि स्त्रीरोग संस्थेची माहिती

@maharashtracity

मुंबई: ऍनिमिया म्हणजेच पंडूरोगाचे रुग्ण भारतात मोठ्या प्रमाणात आहेत. सुमारे ५८ टक्के गर्भवती महिलांना ऍनिमिया (Anaemia) असून देशातील २० ते ४० टक्के माता मृत्यूचे (mother death) कारण ऍनिमिया आहे.

ऍनिमियामुळे होणाऱ्या माता मृत्यूंपैकी दक्षिण आशियात ८० टक्के भारतीय महिलांचे प्रमाण आहे. सकस आहार (nutritious food) न मिळाल्याने ऍनिमिया ही देशातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. सुमारे ५८ टक्के गर्भवती महिलांमध्ये (pregnant women), ५० टक्के गर्भवती नसणाऱ्या महिलांमध्ये तसेच स्तनपान करणाऱ्या महिला, किशोरवयीन मुलींमध्ये ५६ टक्के (१५ ते १९ वर्षे), किशोरवयीन मुलांमध्ये ३० टक्के आणि ३ वर्षाखालील मुलांमध्ये सुमारे ८० टक्के प्रमाण असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी (Obstetrics & Gynecological Society – OGS) तसेच सायन्स इंटिग्रासह ७ मे रोजी दुसरी वर्ल्ड काँग्रेस ऑफ ऍनिमिया (World Congress of Anaemia) आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध तज्ज्ञांनी ऍनिमिया केंद्रस्थानी धरुन वयोगट आणि इतर वर्गावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषणात्मक माहिती दिली.

ऍनिमियातून प्रौढ ही सुटले नसून ५५ टक्के महिलांना, ५८ टक्के गर्भवती महिलांना आणि २४ टक्के पुरुष ऍनिमियाने प्रभावित आहेत. विवाहित महिलांमध्ये पांडुरोगचे प्रमाण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे – २ मध्ये ५२ टक्क्यांवरून नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे – ३ मध्ये ५६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे – ४ नुसार (National Family Health Survey – NFHS) राज्यात एकूण ४८.० टक्के महिला अशक्त आहेत. तर ४९.३ टक्के गर्भवती महिला अशक्त असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी सायन हॉस्पिटलचे (Sion Hospital) स्त्रीरोग विभाग प्रमुख तसेच मुंबई ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीचे वर्तमान अध्यक्ष डॉ. निरंजन चव्हाण यांनी सांगितले की, लोह कमतरता टाळण्यासाठी साधने असून यातून होणाऱ्या पंडूरोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी हा उपकम सुरु आहे. यंदा १४ संस्थांमधील १६ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक सहभागी झाले होते. यात डॉ. ऍनी किहारा यांनी महिलांमधील अशक्तपणाची आव्हाने आणि एलएमआयसीचे धडे या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. संजय गुप्ते यांनी महिलांना आरोग्य राखण्यासाठी रणनीती आणि कल्पना स्पष्ट केल्या. तर अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ. अनाहिता चौहान आणि डॉ. श्याम देसाई यांनी दक्षिण पूर्व आशियातील आयडीएच्या घटना कमी करण्याविषयी सांगितले. डॉ. कोमल चव्हाण यांनी ऍनिमिया फ्यूल टू प्रेग्नन्सी गुंतागुंत या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. रमेश कुमार यांनी मुलांमधील न्यूट्रिशनल ऍनिमिया या विषयावर, महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी कोविड पेशंटमधील ऍनिमिया या विषयावर मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here