By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: एसटीची पहिली फेरी १ जून १९४८ रोजी अहमदनगर- पुणे मार्गावर धावली. या घटनेला यंदा ७५ वर्ष पुर्ण होत आहेत. त्या निमित्ताने एसटीच्या “अमृतमहोत्सवी” वर्धापन दिन सोहळा ओरिसा येथील रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला होता. हा कार्यक्रम आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यंशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईंट येथे दिनांक १४ जून २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच या कार्यक्रमासाठी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, एसटीचे सदिच्छा राजदूत मकरंद अनासपूरे हे देखिल उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

या सोहळ्याच्या निमित्ताने एसटीच्या कॉफीटेबल पुस्तकाचे अनावरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. २५ वर्षापेक्षा जास्त सुरक्षित सेवा बजावणाऱ्या ५ चालकांचा सपत्नीक सत्कार तसेच कोरोना महामारीनंतर गेल्या वर्षभरात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या राज्यातील पहिल्या तीन विभागांचा व २५० आगारापैकी गटनिहाय ९ आगारांचा सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

याबरोबरच दुरदर्शी प्रणालिव्दारे राज्यातील विविध बसस्थानकांचे भुमिपुजन, उद्घाटन आणि बसस्थानक परिसराचे कॉक्रिटिकरण या कामाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे एसटीच्या ७५ वर्षाचा इतिहास सांगणाऱ्या “एसटी विश्वरथ” या वातानुकुलित फिरत्या बसचे उद्घाटन देखिल मुख्यमंत्री यांच्या हस्ते या वेळी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here