मुंबईत दिवसभरात ६९३ रूग्ण

@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी ९,६७७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,१७,०३५ झाली आहे. शुक्रवारी १०,१३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५७,७२,७९९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९४ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,२०,७१५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात शुक्रवारी १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १५६ मृत्यूंपैकी ११७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३५५ ने वाढली आहे. हे ३५५ मृत्यू, नाशिक -१०१, ठाणे-४०, पुणे-३५, सांगली-२२, औरंगाबाद-२१, उस्मानाबाद-२१, लातूर-१८, पालघर-१४, कोल्हापूर-१३, अहमदनगर-९, परभणी-९, नागपूर-७, सिंधुदुर्ग-७, रत्नागिरी-६, सोलापूर-५, अकोला-३, चंद्रपूर-३, सातारा-३, अमरावती-२, बीड-२, गडचिरोली-२, हिंगोली-२, जळगाव-२, रायगड-२, वर्धा-२, बुलढाणा-१, धुळे-१, जालना-१ आणि नंदूरबार-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०५,९६,९६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,१७,०३५ (१४.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३३,७४८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ६९३

मुंबईत दिवसभरात ६९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७१८९६२ एवढी झाली आहे. तर २० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५३६८ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here