क्लिनआप मार्शलने ठळक मजकुरातील कोट परिधान करण्याचे आदेश

मुंबई: मुंबईकरांना स्वच्छतेबाबत शिस्त लावण्याची जबाबदारी पार पाडताना जे क्लिनअप मार्शल (clean up Marshal) पत्रकार, नागरिक, महिला, तरुणी यांच्याशी गैरवर्तणूक करतील, त्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या क्लिनअप मार्शलवर नियमाने कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, घाण करणाऱ्या, थुंकणाऱ्या आणि कोरोना वातावरणात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणारे काही ‘क्लिनअप मार्शल’ पत्रकार व नागरिक यांच्याशी गैरवर्तणूक करीत असल्याच्या तक्रारी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्याकडे केल्या आहेत.

त्यामुळे महापौरांनी त्याची गंभीर दखल घेतली. शनिवारी क्लिनअप मार्शल प्रतिनिधी व पालिका घनकचरा विभागाचे संबंधित अधिकारी यांची महत्वाची बैठक घेतली. यापुढे पत्रकार वा नागरिक असो त्यांच्याशी शिस्तीने वागावे, कोणत्याही प्रकारची गैरवरवणूक करू नये, असे महापौर यांनी बजावले आहे. मात्र जर गैरवर्तवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित क्लिनअप मार्शलची खैर नाही. दोषी आढळणाऱ्या क्लिनअप मार्शलवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तसेच, खऱ्या व खोट्या क्लिनअप मार्शलची ओळख होण्यासाठी व बोगस क्लिनअप मार्शलला रोखण्यासाठी, क्लीन अप मार्शलच्या गणवेशावरील कोटवर त्याची ओळख दर्शविणारा क्रमांक, संबंधित विभागाचे व क्लिनअप मार्शलचे नाव आणि कंत्राटदार याची माहिती समोरील आणि मागील बाजूस ठळक अक्षरात वाचता येईल, यापद्धतीने एका आठवड्यात दर्शविण्यात यावी, असे आदेश महापौरांनी दिले आहेत.

मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी व नागरिकांना शिस्त लावण्यासाठी नेमलेल्या क्लिनअप मार्शलपैकी अनेकजण चांगले काम करीत आहेत ; मात्र काही क्लिनअप मार्शलची गैरवर्तणूक योग्य नसून त्याचे समर्थन करता येणार नाही. यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे महापौरांनी संबंधित क्लिनअप मार्शल व पालिका अधिकारी यांना बजावले आहे.

तसेच, क्लिनअप मार्शल परिधान करत असलेल्या गणवेशावरील कोटावर, संबंधित क्लिनअप मार्शलची ओळख दर्शविणारा क्रमांक, विभागाचे, क्लिनअप मार्शलचे नाव तसेच संबंधित कंत्राटदार याची माहिती समोरील आणि मागील बाजूस ठळक अक्षरात वाचता येईल, यापद्धतीने दर्शवावी. जेणेकरून ठळकपणे त्याची ओळख सर्वांना समजेल तसेच बोगस क्लिनअप मार्शल काम करीत असेल तर त्याचासुद्धा शोध घेणे सहज सुलभ होईल, असे आदेश महापौरांनी दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापर्यंत करण्यात यावी. जेणेकरून यावर अंतिम निर्णय घेऊन हा कोट संपूर्ण मुंबईतील क्लिनअप मार्शलला लागू करता येईल, असे आदेशही महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here