Twitetr : @maharashtracity
मुंबई: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी केंद्रांचे भाडे आणि इतर मागण्यांना घेऊन १५ जून रोजी आयुक्त कार्यालयावर थाळी नाद आंदोलन करणार होते. मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राजेश सिंग यांनी दिली.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून अंगणवाडी केंद्राचे भाडे देण्यात आले नाही. तसेच सेविकांच्या मानधनापासून ते मोबईल पर्यंतच्या सर्वच तक्रारी केव्हाच ऐकल्या जात नाहीत. गेले वर्षभरापासून केद्रांचे भाडे दिले जात नाही. यामुळे जागेचे मालक अंगणवाडी केंद्रातील साहित्य बाहेर फेकण्याचा इशारा देत असल्याने आंदोलनाचा इशारा दिला होता. २०२२ वर्षापासून गणवेश, मोबाईल रिचार्ज, फंडचे पैसे असा निधी देखील मिळाला नाही. शहरात आणि ग्रामीण भागात हीच स्थिती असल्याचे सांगण्यात आले. प्रकल्पात गंभीर स्थिती झाली असून केंद्राचे सरकारी नियमानुसार ७५० रुपये महिन्याकाठी भाडे आहे. तर मुंबई शहरात ५ हजार अंगणवाडी केंद्र आहेत. यातील १०० ते १५० केंद्र हे म्हाडाच्या इमारती, बौद्ध विहार, सार्वजनिक वाचनालये अशा बिन भाड्याच्या जागेत चालवल्या जातात. तर ८० टक्के अंगणवाडी केंद्र भाड्यावर चालवले जातात. अशा ठिकाणी मोठा गोंधळ सुरु असल्याचे सांगण्यात आले. या सर्व मागण्यासाठी १५ जून रोजी आयुक्ताच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येणारे होते. मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.