सत्तेच्या हव्यासापोटी भाजपने ओबीसी आरक्षण घालवले – आ कुणाल पाटील

@maharashtracity

धुळे: नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता हातातून जाऊ नये म्हणून कोर्टाने आदेश दिल्यावरही २०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी लोकसंख्येची आकडेवारी दिली नाही. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाने ओबीसीचे आरक्षण घालविले आहे. भाजपच्या नाकर्तेपणामुळेच आज ओबीसी आरक्षणाचा चक्काजाम झालेला आहे. असा घणाघात महाराष्ट्र कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी आज निषेध आंदोलनात केला.

या आंदोलनात धुळे जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटना व सामाजिक संस्थांनी कॉंग्रेसच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात भाजपाने राज्यभरात आज चक्काजाम आंदोलन केले असतांना दुसरीकडे कॉंगे्रसनेही भाजपावर खापर फोडण्यासाठी धुळ्यात केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दडपशाही विरोधात आणि अघोषित आणीबाणी विरोधात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

आंदोलनात माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या समवेत महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, मनपा विरोधी पक्षनेते साबीर सेठ, माजी आ. प्रा. शरद पाटील, गुलाबराव कोतेकर, डॉ. दरबारसिंग गिरासे, डॉ. अनिल भामरे, लहू पाटील, गुणवंत देवरे, रितेश पाटील, पंढरीनाथ पाटील, साहेबराव खैरनार, अशोक सुडके, सरपंच प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, अलोक रघुवंशी, गायत्री जयस्वाल, बानुबाई शिरसाठ, इंटकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, भानुदास माळी, माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन, रावसाहेब पाटील, जगदीश देवपूरकर युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष पंकज चव्हाण, दीपक वाघ अक्षय पाटील, संदीप पाटील यांच्यासह कॉंग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

विविध संघटनांचा पाठिंबा

ओबीसी आरक्षणासाठी पुकारलेल्या आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील धुळे जिल्हा कॉंग्रेसच्या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध संघटनांनी पाठिंबा आंदोलनस्थळी येऊन जाहीर केला. यावेळी तेली समाजाचे नेते प्रथम महापौर भगवान बापूजी करनकाळ, ओबीसी आरक्षण बचाव समिती, खानदेश तेली समाज मंडळ, जमात उलेमा, अन्सारी बिरादरी, सुवर्णकार समाज, वीरशैव गवळी लिंगायत संघटना, मराठा सेवा संघ, भांग्या मारुती व्यायाम शाळा, मातंग समाज पारधी, समाज धुळे जिल्हा आरक्षण कृती समिती, धुळे जिल्हा शिंपी समाज अशा विविध संघटना तसेच समाजातील लोकप्रतिनिधींनी कॉंग्रेसच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here