twitter : @maharashtracity

मुंबई: रेल्वे स्थानकांवर बाळाला दूध पाजण्यासाठी महिला प्रवाशांना सोय करण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून  नॉन फेअर रेव्ह्युन्यू (एनएफआर) अंतर्गत मुंबई विभागाच्या ७ रेल्वे स्थानकांत १३ ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येत आहे. हे करत असताना रेल्वेस्थानकांवरील गर्दीचा विचार करता त्यानुसार तेथील स्तनपान केंद्रांची संख्या ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (तीन), लोकमान्य टिळक टर्मिनस (तीन), ठाणे (दोन), कल्याण, पनवेल आणि लोणावळा (दोन) स्थानकात असे १३ हिरकणी कक्ष उभारल्या जात आहेत. हा प्रकल्प नवीन आणि नाविन्यपूर्ण भाडे (नॉन फेअर) रेव्हेन्यू आयडियाज योजने अंतर्गत राबविण्यात येत आहे. हे कंत्राट मेसर्स बुलस आय मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले असून २७ डिसेंबर २०२२ च्या स्वीकृती पत्र अंतर्गत ६० हजार रुपये प्रति नर्सिंग पॉड आणि २ वर्षांचा करार कालावधी करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, हिरकणी कक्ष ही सुविधा आहे जी प्रवास आणि ट्रेन बदल करण्याच्या दरम्यान प्रतिक्षा कालावधीत बाळांच्या आहारासाठी सुरक्षित, मोफत, स्वच्छतापूर्ण जागा प्रदान करते. ममता कक्षाचा वापर विनामूल्य असेल, तसेच नर्सिंग पॉड् मध्ये प्रदान केलेल्या डायपर चेंजिंग स्टेशनची सेवा/ वापर देखील विनामूल्य असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here