मुंबईत दिवसभरात ६५६ रूग्ण

@maharashtracity

मुंबई: गुरुवारी राज्यात ९,१९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,७०,५९९ झाली आहे. गुरुवारी ८,६३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,२८,५३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०१ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१६,६६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात गुरुवारी २५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण २५२ मृत्यूंपैकी २०६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१८,७५,२१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,७०,५९९ (१४.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ६,१५,२८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,३३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ६५६:

मुंबईत दिवसभरात ६५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२२८७८ एवढी झाली आहे. तर २१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५४७२ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here