@maharashtracity
‘कमळ’ रुसले,’घड्याळ’ हसले
हाती येईना !! ‘हात’ !!
प्रश्न काढले !! शंभर त्यांनी !
अधिवेशनी !! ‘बात’ !!१!!
सेनेचा वाघही !! झाला तयार !!
हाती धारदार !! ‘पाती’ !!
येऊद्या अंगी !! चेंडू कितीही !!
‘ते’ही माजी !! ‘साथी’ !!२!!
नसली संधी !! म्हणून काय ?
फसले इथंच !! पाय !!
आम्ही वापरू !! शक्कल आमची !!
सोबत सीबीआय !! हाय !!३!!
बंद बोलती !! विरोधकांची !!
‘पॉवर’ करेल !! ‘झोल’ !!
कळेना कुणा !! बातच न्यारी !!
पाणी खोल !! खोल !!४!!