@maharashtracity

मुंबई: राज्याच्या वन महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत असून यानिमित्ताने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते म्हाडा मुख्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वाहनांच्या पार्किंगच्या दोन हजार फूट जागेत ४० प्रकारची ३०० झाडे यावेळी लावण्यात आली.
राज्यातील सर्व कार्यालय, गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात मिनी फॉरेस्ट निर्माण करावे या संकल्पनेतून हे वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

मिशन ग्रीन मुंबई या सामाजिक संस्थे व म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या पुढाकाराने माध्यमातून वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात मिनी फॉरेस्टची निर्मिती करण्यात येत आहे.

यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी म्हाडातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या  मे-२०२१ मधील एक-दोन दिवसांच्या वेतन कपातीच्या माध्यमातून अंशतः जमा झालेल्या ३१ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश विनोद घोसाळकर यांच्या हस्ते आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

या कार्यक्रमास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे तसेच मिशन ग्रीन मुंबई संस्थेचे सुभाजीत मुखर्जी, अमित सावंत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here