धुळे: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे गावातील शेतमळ्यात बिबट्याने वासराचा फडशा पाडला. या घटनेमुळे कासारेसह काटवान परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तथापि, बिबट्याचा (Leopard) तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

साक्री तालुक्यातील कासारे गावात शेतकरी सतिष भाऊसाहेब देसले रा.कासारे यांचा शेतमळा आहे. रविवारी पहाटे त्यांचे बंधू नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांना गोठ्यातील गायीचे वासरु (calf) मृतावस्थेत दिसले. बिबट्याने त्या वासराचा शरीराचा पूर्ण भाग खाल्लेला होता. सतिष देसले यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पिंपळनेर येथील वनरक्षक दीपाली बडगुजर ह्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी या घटनेची माहिती घेत पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here