व्यथित पद्मश्री डॉ. तात्याराव लहानेंसह आठ डॉक्टरांचे विधान

Twitter: @maharashtracity

मुंबई: शस्त्रक्रियांची संख्या पुरस्कारांसाठी वाढवत राहिलो नाही. मात्र, आता होत असलेले आरोप सहन होत नाही. या पुढे जे जे रुग्णालयाशी आमचा संबंध राहणार नाही. असे आरोप होत असतील तर आमचे राजीनामे स्वीकारावेत असे पद्मश्री  डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यथित होऊन प्रसार माध्यमांसमोर कैफियत मांडली. डॉ. लहाने आणि इतर आठ डॉक्टरांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन उपरोक्त विधान केले.  

डॉ. लहाने म्हणाले की, राज्यात कुठेही शस्त्रक्रिया करण्याचा मला शासनाने अधिकार दिला असून पूर्वी साडे चौदा लाख शस्त्रक्रिया केल्या होत्या. आताही २७ लाख करावयाच्या आहेत. मात्र मी ही स्वाभिमानी असून आता राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून जे जे रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख तसेच डॉ. तात्याराव लहाने विरुद्ध या विभागातील निवासी डॉक्टर अशी खडाजंगी सुरु आहे. 

शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत डॉ. लहाने यांच्यासह इतरही आठ डॉक्टर उपस्थित होते. यावेळी डॉ. लहाने म्हणाले की, माझे रघुनाथ नेत्रालयात काम सुरु असून त्या ठिकाणी रुग्णसेवा करणार. पुन्हा आता बोलावलं तरी जाणार नाही. त्या ठिकाणी गरीब रुग्णांचे डायलेसिस करतो, ते करणार. सध्या खालच्या पातळीवर जाऊन टिका सुरु आहे. माझ्याकडून कधीही रुग्णांचे दुर्लक्ष झाले नाही. डॉ. सुमित लहाने यांने एनएमसीच्या गाईड लाईननुसार काम केलं आहे. त्याने कॅन्सर रुग्णांवर उपचार केले. त्या रुग्णांसाठी तो जे जे रुग्णालयात येत असे. मात्र आता आमच्यावर गुन्हा दाखल करण्यापर्यंत मजली गेली असून रुग्णांसाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आता सहन होत नाही. माझं वय झाले आहे. जे रूग्ण येतील त्यांच्यावर उपचार करू. १२ वर्षात १ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यात, असेही त्यांनी सांगितले.

मी ६७ वर्षाचा झाला असून पुरस्कारासाठी शस्त्रक्रियांची संख्या वाढवून काम करत नव्हतो. आता आम्ही कोणीही जे जे रुग्णालयात येणार नाही. त्यांनी चूक केली असेल तर पित्याप्रमाणे त्यांना आम्ही माफ केले. जेजेत डोळ्यासंबंधित अल्ट्रा मॉडर्न शस्त्रक्रिया होतात. विशेष तपासण्या आपल्या विभागात करतो. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ग्रामीण भागात जाऊन मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतो.”

– डॉ. तात्याराव लहाने, मोतीबिंदू निवारण माहिम प्रमुख. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here