@maharashtracity

धुळे: महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी ’एक हात मदतीचा’ या अभियानाद्वारे अभाविप, धुळे (ABVP Dhule) शाखेतर्फे शहरातील विविध भागातून निधी जमविण्यास सुरुवात करण्यात आली. 

या अभियानाला सोमवारी सुरुवात झाली.महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून तसेच महापूरामुळे (flood) मोठी जिवीत हानी झाली. 
दरड व महापूरामुळे सुमारे 139 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. पुरग्रस्तांसह दरडी कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या धुळे शाखेच्या कार्यकर्त्यांनी सदर महापुराचा सामना करणार्‍या पुरग्रस्तांसाठी ’एक हात मदतीचा’ अभियान राबवायला सुरुवात केली आहे.

शहरातील गांधी पुतळा येथून सोमवारी या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी अनेक नागरिकांनी सढळ हाताने मदत करुन अभियानाला पाठबळ दिले. 

यावेळी अभाविप धुळे शहर मंत्री भावेश भदाणे, सहमंत्री आदिती कुलकर्णी, वैष्णवी मराठे, तंत्रशिक्षण कार्यप्रमुख आदिनाथ कोठावदे, राजेंद्र पाटील, विठ्ठल माने, अविनाश उखंदे यांनी गांधी पुतळा चौकात थांबून हा निधी गोळा करण्यासाठी प्रयत्न केलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here