एक आठवडाभर राबवणार मोहिम

Twitter : @maharashtracity

मुंबई: मुंबईसह राज्यातील नागरिकांमध्ये लठ्ठपणाचे (obesity) प्रमाण वाढले आहे. वाढलेल्या लठ्ठपणामुळे नागरिकांमध्ये अनेक जीवनशैली संदर्भातील आजारही वाढले आहेत. याच आजारांवर नियंत्रण मिळावे यासाठी राज्य सरकारकडून लठ्ठपणासाठी सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी स्थूलपणा मिशन राबविण्यात येणार आहे. येत्या १९ ते २६ जूनपर्यंत हे मिशन राबवले जाणार असून राज्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयाला किमान तीन सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

यासंदर्भातील गेल्या आठवड्यात बैठक पार पडली. या बैठकीत सर्वच मिशनचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार, शालेय विद्यार्थ्यांनंतर आता सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा बीएमआय (BMI) आणि इतर आरोग्य तपासण्या (medical tests of govt employees) केल्या जाणार आहेत. ज्या सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५० च्या वर आहे, तिथे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची टीम जाऊन आरबीएस (RBS), बीएमआय, लठ्ठपणा संबंधित मार्गदर्शन आणि स्थूलपणाचे पोस्टर आणि बॅनर्समधून जनजागृती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील मुले स्थूल 

राज्यातील शालेय मुलांमधील स्थूलपणा रोखण्यासाठी आणि त्यांना सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारने स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान हाती घेतले आहे. यात विविध शाळांमधील तब्बल १४ हजार २७८ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५४० विद्यार्थ्यांमध्ये स्थूलपणा आढळून आला आहे. यामध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. मुंबईतील ९५४ वैद्यकीय महाविद्यालय निहाय विद्यार्थ्यांची तपासणी केली गेली. त्यापैकी १५९ विद्यार्थी स्थूल आढळून आले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here